Chandwad Devala : चांदवड देवळा मतदारसंघातून आमदार डॉ.राहुल आहेर यांची माघार

Continues below advertisement

Chandwad Devala : चांदवड देवळा मतदारसंघातून आमदार डॉ.राहुल आहेरयांची माघार 

हेही वाचा : 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा (Maharashtra Assembly Elections 2024) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिकच्या चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात (Chandwad-Deola Assembly Constituency) उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून आहेर बंधूंमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळाली होती. आता या मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर (Dr Rahul Aher) यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा नाफेडचे संचालक केदा आहेर (Keda Aher) यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

चांदवड-देवळा मतदारसंघात (Chandwad Deola Assembly Constituency) राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. भाजपच्या (BJP) तिकिटासाठी विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर (Dr Rahul Aher) व नाफेडचे संचालक केदा आहेर (Keda Aher) या दोघात भावात जोरदार रस्सीखेच दिसून आली. चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक डॉ. राहुल आहेर हे भाजपचे आमदार आहे. यंदा मात्र त्यांना तिकिटासाठी त्यांचे बंधू नाफेडचे संचालक व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्याशी झुंज द्यावी लागत होती. केदा आहेर हे विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहचत आहेत. तर गावागावातून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी बैठका सुरू करण्यात आल्या होत्या. यामुळे आहेर बंधूंमध्ये उमेदवारीवरून संघर्ष दिसून येत होता. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram