Chandrashekhar Bawankule Vs Amol Mitkari : 2024च्या मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत धुसफूस
Chandrashekhar Bawankule Vs Amol Mitkari : 2024च्या मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत धुसफूस .. अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा संकल्प - मिटकरी
२०२४ च्या निवडणुकीआधीच महायुतीत धुसफूस सुरु झालीय.. २०२४ साली देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय.. भंडारा जिल्ह्यातल्या लाखनीत काल भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.. या मेळाव्यात फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा संकल्प बावनकुळेंनी कार्यकर्त्यांकडून वदवून घेतला..
बावनकुळेंच्या वक्तव्यावर अजित पवार गट आणि शिंदे गटानं तिरकस प्रतिक्रिया दिलीय.. २०२४ साली अजित पवारांनाच मुख्यमंत्री करण्याचा संकल्प राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचं अमोल मिटकरी म्हणालेत.. तर कुणीही महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये अशी प्रतिक्रिया शिंदे गटानं दिलीय..