Chandrashekhar Bawankule 99 टक्के बंडखोर अर्ज मागे घेतील,जे मागे घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल
99 टक्के बंडखोर अर्ज मागे घेतील, जे उमेदवारी मागे घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल
ज्या बंडखोरांनी अर्ज भरले त्यातील 99 टक्के लोक अर्ज मागे घेतील, जे उमेदवारी मागे घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल
निवडणुकीत आता काहीही मुद्दे नाहीत,विकासाचा अजेंडा नाही..म्हणून अडीच तीन वर्षांपुर्वीच्या गोष्टी बाहेर काढून जितेंद्र आव्हाड बोलतायत. - सहानुभुती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. - संजय राऊत म्हणजे शोले सिनेमातील असरानी आहेत...ते काहीही बोलतात..लोक त्यांच्या बोलण्याची मजा घेतात - राहुल गांधींनी अमेरिकेत म्हटलं होतं की देशाला आरक्षणाची गरज नाही, याचं नाना पटोलेंनी समर्थनही केलं होतं - आता नागपुरात येऊन पुन्हा तोच अजेंडा रेटतायत..आम्ही त्यांना जाब विचारू - जितेंद्र आव्हाडांच्या मनात विषच आहे..ते विष त्यांना जगू देत नाही..जर जितेंद्र आव्हाड संघाविरोधात बोलणार नाहीत, तर त्यांच्या मतदारसंघात त्यांना मतं मिळणार नाहीत हे त्यांना माहिती आहे - आमच्या पक्षातील ज्या बंडखोरांनी अर्ज भरले त्यातील 99 टक्के लोक अर्ज मागे घेतील याची आम्हाला खात्री आहे..आणि जे उमेदवारी मागे घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल - अरविंद सावंतांना त्यांच्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील महिला चपला मारतील. - मविआच्या सगळ्या नेत्यांना मी विनंती करतो की तुम्ही जनतेसाठी काय करणार आहात ते त्यांना मतं मागण्यापुर्वी सांगा..आम्ही शेतकऱ्यांचं वीजबील, लाडकी बहिण योजना हे सगळं देणार आहे - मल्लिकार्जुन खऱगे म्हणतायत की महाराष्ट्रातील योजना चुकीच्या आहेत, त्या परवडणार नाहीत - गोपाळ शेट्टींचं संपूर्ण आय़ुष्य़ भाजपमधे गेलं आहे आणि गोपाळ शेट्टी उद्या दुपारी ३ पर्यंत विचार करून पक्षासाठी योग्य तो निर्णय घेतील - मी दादाराव केचेंचेही आभार मानतो की त्यांनी बंडखोरी मागे घेतली.. - एक दोन टक्के ठिकाणी आम्हाला दिसतंय आमचे बंडखोर मागे घेण्यास तयार नाहीत..त्यांच्याशीही आम्ही बोलतोय की त्यांनी पक्षाचे आदेश न मानल्यास पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद होतील