Chandrashekhar Bawankule : विरोधकांना जनतेनं मोठा शाॅक दिलाय - चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule : विरोधकांना जनतेनं मोठा शाॅक दिलाय - चंद्रशेखर बावनकुळे
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिपद मिळाले नाही. यामुळे भुजबळ कमालीचे संतप्त झाले असून, त्यामुळेच ते मेळाव्याला उपस्थित राहिले नसल्याची चर्चा मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये होती. या घडामोडीमुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून, नागपूरच्या थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. यानंतर आज छगन भुजबळ यांनी थेट हल्लाबोल केला. मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं- छगन भुजबळ (Chhagan Bhujbal React On Maharashtra Cabinet Expansion) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. तसेच मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, तरी भुजबळ संपला नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले. तसेच मी सामन्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो. मंत्रिपदं आली गेली...भुजबळ कधी संपला नाही, असंही ते म्हणाले. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठं यश मिळालं. तसेच अजित पवारांशी मी चर्चा केली नाही आणि मला तशी गरजही वाटली नाही, असंही छगन भुजबळ यांनी सांगितले. छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवारांची कोंडी? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार यांची काहीशी कोंडी झाली होती. छगन भुजबळ व मनोज जरांगे वादाचा फटका राष्ट्रवादीला बसत असल्याचे पक्षातील नेत्यांचे निरीक्षण होते. याउलट छगन भुजबळांनी ओबीसी समाजाचा पुरस्कार केल्याचा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदाही झाला.