Chandrashekhar Bhawankule : मित्र पक्षांच्या जागांमध्ये हस्तक्षेप केला नाही -चंद्रशेखर बावनकुळे

Continues below advertisement

Chandrashekhar Bhawankule : मित्र पक्षांच्या जागांमध्ये हस्तक्षेप केला नाही -चंद्रशेखर बावनकुळे  आवडीचे खाणे राजकीय ताणेबाणे एबीपी माझाच्या या खास कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलखुलास पद्धतीने वर्तमान राजकीय परिस्थितीवर फटकेबाजी केली... महायुतीत भाजपचे 34 जागांची अपेक्षा होती.. मात्र मित्र पक्षांना ऍडजेस्ट करून एकनाथ शिंदे व अजित दादांचा सन्मान ठेवण्यासाठी भाजपने मोठे मन करून आपल्या जागा त्यांना दिल्याचं बावनकुळे म्हणाले...   मनसे महायुतीत आल्यानंतर आम्ही सर्व अड्जस्ट करू, दोन चार जागांवर कॉम्प्रोमाइज केल्याने भाजप ला काही फरक पडत नाही असेही बावनकुळे म्हणाले..   होय आम्ही सर्व 48 जागांचे सर्वेक्षण केले होते.. त्यामध्ये शिंदेंच्याही जागांचा समावेश होता.. मात्र हे लपून छपून नव्हे, तर शिंदेंना सांगून केले होते.. शिंदे आणि अजित दादांनी ही आमच्या जागांवर सर्वेक्षण केले होते.. सर्व सर्वेक्षणाचा अभ्यास करून उमेदवार दिले असल्याचे स्पष्टीकरण ही बावनकुळे यांनी दिले...   दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचा फिक्सिंग आहे, या प्रकाश आंबेडकरांच्या आरोपाला बावनकुळे यांनी फेटाळून लावले.. अशी फिक्सिंग होत नाही आणि तसेही भाजप आणि काँग्रेस यांचे विचार वेगवेगळ्या असल्याने ते एकत्रित येऊ शकत नाही असं बावनकुळे म्हणाले... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram