ChandraShekhar Bawankule PC | वसंत देशमुखांवर कडक कारवाई करणार, बावनकुळे अॅक्शन मोडवर

Continues below advertisement

ChandraShekhar Bawankule PC | वसंत देशमुखांवर कडक कारवाई करणार, बावनकुळे अॅक्शन मोडवर

जिल्ह्यातील संगमनेरमध्ये सुजय विखे यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरातांच्या (Balasaheb thorat) सुकन्या जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मतदारसंघातील वातावरण तापलं आहे. तसेच, राज्यभरातून या वक्तव्याच्या निषेध करण्यात येत असून महिला नेत्यांनीही सुजय विखेंसह (Suay vikhe) भाजपला लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे. वसतंरावांनी जयश्री थोरातांवर पातळी सोडून टीका केली, त्यानंतर फारच गदारोळ झाला. संगमनेरमध्ये आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाड्यांची जाळपोळ करण्यास सुरुवात केली. पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 8 तास ठिय्या दिला होता. एकंदरीतच वसंतरावांच्या आक्षेपार्ह्य वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. याप्रकरणी, आता जयश्री थोरात यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ व संयमी नेते बाळासाहेब थोरात यांनी पहिली प्रतिक्रियी दिली आहे. आपल्या लेकीवर गलिच्छ शब्दात टीका केल्यानंतर संमयी नेते ओळख असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्यातील बापही चांगलाच संतापल्याचं पाहायला मिळालं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram