Chandrashekhar Bawankule File Nomination : बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार
Chandrashekhar Bawankule File Nomination : बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार
महायुतीचे नेते कामठीला येत आहेत.. कामठीतील लोक मला मोठया प्रमाणात मतं देऊन निवडणून देतील तिकीट मिळालं नव्हतं त्या दिवशी वाईट वाटलं होतं.. वाईटातून चांगलं घडतं.. त्याचा आनंद ऑन बंडखोर ज्याना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी अपक्ष अर्ज भरलेत.. त्यांनी तसं करु नये... वरूड-मोर्शीसारख्या काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आहेत.. पाच वर्षांपूर्वी उमेदवारी नाकारण्यात आलेले चंद्रशेखर बावनकुळे आज प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याच स्वाक्षरीचा बी फॉर्म त्यांच्या उमेदवारीसाठीचा घेऊन उमेदवारी दाखल करत आहेत... फार कमी कार्यकर्त्यांच्या जीवनात असा प्रसंग येतो अशी प्रतिक्रिया यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे... पाच वर्षांपूर्वी राजकीय जीवनात एक कठीण प्रसंग आला होता, जेव्हा पक्षाने उमेदवारी नाकारली होती, मात्र त्याच्यातून बरेच काही शिकून आम्ही पुढे गेले आहोतअशी प्रतिक्रिया बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी दिली आहे.. राजकीय जीवनात असे प्रसंग येतात मात्र संयम ठेवलं पाहिजे असेच आवाहन सर्व भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना करेल असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले... महायुतीचा जागावाटप अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला असून आज दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल असा दावाही बावनकुळे यांनी केला मात्र राज्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील हे बावनकुळे यांनी मान्य केले आहे... ज्या ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल त्या जागांची घोषणा महायुतीकडून केली जाईल अशी माहिती ही त्यांनी दिली... लवकरच महायुतीचा संयुक्त जाहीरनामा सर्वांसमोर येईल आणि त्यानंतर महायुती च्या संयुक्त सभा ही सुरू होतील असेही बावनकुळे म्हणाले...