OBC Reservation: ओबीसी आरक्षणावरून श्रेयवाद, बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा
Continues below advertisement
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी याचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि महायुती सरकारला दिले. बावनकुळे म्हणाले, 'मला या गोष्टीचं दुःख आहे की उद्धव ठाकरे जींचं सरकार असताना ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण गेलं होतं'. त्यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) भक्कमपणे बाजू मांडल्यामुळेच २७ टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. अनेक वर्षांपासून नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने विकासाची कामे थांबली होती, मात्र आता या निवडणुकांमुळे विकासाचे एक नवीन पर्व सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागाचा विकास होईल. दरम्यान, विरोधकांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आक्षेप घेतलेला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement