Chandrashekhar Bawankule On Chhagan Bhujbal and Sharad Pawar Meeting : भुजबळ-शरद पवार भेटीवर बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule On Chhagan Bhujbal and Sharad Pawar Meeting : भुजबळ-शरद पवार भेटीवर बावनकुळे काय म्हणाले?
Chhagan Bhujbal: आम्ही मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो तरीही आमचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त नाही, गावगाड्याची जास्त माहिती तुम्हालाच; छगन भुजबळांचं शरद पवारांना आर्जव
मुंबई: तुम्ही राज्यातील ज्येष्ठ नेते आहात. प्रत्येक गावात आणि जिल्ह्यात समाज घटकांची नेमकी काय परिस्थिती आहे, याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे. आम्ही मंत्री झालो किंवा मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झालो म्हणजे आमचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळे तुम्ही आरक्षणासंदर्भातील बैठकीला आले पाहिजे, अशा शब्दांत राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार (Chhagan Bhujbal) यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. छगन भुजबळ यांनी सोमवारी सकाळी अचानकपणे मुंबईतील सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीचा संपूर्ण वृत्तांत प्रसारमाध्यमांना सांगितला.
आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीयांच्या बैठकीला तुम्ही यायला पाहिजे होते, असे मी त्यांना सांगितले. यावर शरद पवार यांनी म्हटले की, आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका आम्हाला माहिती नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांच्याशी काय बोलले, त्यांना काय आश्वासनं दिली, हे आम्हाला माहिती नाही. तसेच तुम्ही लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांचे उपोषण सोडवताना काय बोललात, याचीही आम्हाला कल्पना नाही. त्यामुळे आम्ही बैठकीला आलो नाही, असे शरद पवार यांनी म्हटल्याचे भुजबळ यांनी सांगितले.