RSS Politics: 'संघावर बंदीची मागणी करणारे मूर्ख आणि राष्ट्रद्रोही', चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल
Continues below advertisement
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पथसंचलनावर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी करणारे लोक मूर्ख आणि राष्ट्रद्रोही आहेत', अशी जोरदार टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. देशाची समता आणि बंधुत्वाला RSS पासून धोका असल्याचं सांगत, सचिन खरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे ही मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, संघ राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणासाठी कार्य करणारी संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'विकसित भारत' संकल्पनेत संघाची विचारधारा दिसते, त्यामुळे संघावर बंदी घालण्याचा विचार राष्ट्रद्रोही आहे, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement