Chandrapur Rain : चंद्रपूर जिल्ह्याला पावसानं झोडपलं, मुलाला डॉक्टरकडे नेण्यासाठी बापाची धावपळ

तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन एका बापाने पुरातून वाट काढल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील आज सकाळची ही घटना असून या घटनेने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा पुन्हा एकदा समोर आली आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळं पोडसा गावाला बेटाचं स्वरूप आलंय. त्यातच श्यामराव गिनघरे यांचा मुलगा कार्तिक तापाने फणफणत होता. गावात दवाखाना नसल्याने शामराव यांनी मुलाला कडेवर घेऊन या पुरातून वाट काढली आणि 5 किलोमीटर वर असलेल्या वेडगाव येथील खाजगी डॉक्टर चे घर गाठले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola