Chandrapur जिल्हा बँकेतील काँग्रेस अंतर्गत वादामुळे भाजपला आयती संधी, गैरव्यवहारात CBI चौकशी?

Continues below advertisement

एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्य़ा कारवाईवर राज्यातील सत्ताधारी सुडाची कारवाई म्हणून टीका करतायत. तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसअंतर्गत वादातून जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचेच खासदार बाळू धानोरकर यांनी केली. विशेष म्हणजे धानोरकर यांनी लोकसभेत केलेल्या या मागणीवर सीबीआय चौकशीचं आश्वासन केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी दिलं. चंद्रपूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं वर्चस्व आहे. काही वर्षांपासून बँकेतील गैरव्यवहाराचा मुद्दा गाजतोय. हे प्रकरण काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत लावून धरलं आणि सीबीआय चौकशीचं आश्वासन मिळवलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram