Chandrapur Daru : चंद्रपूरमध्ये दारुबंदी उठली, मद्यप्रेमींचा नवा रेकॉर्ड ABP Majha
बातमी आपल्या सगळ्यांनाच गुंगवणारी आहे. कारण चंद्रपुरातून अशीच गुंगवणारी एक आकडेवारी समोर आलेय. चंद्रपुरात ५ जुलै २०२१ ला दारूबंदी उठली आणि त्यानंतर गेले ६ महिन्यात चंद्रपूरकरानी तब्बल ९४ लाख लिटर दारू रिचवली आहे. यासंदर्भात नुकतीच आकडेवारी समोर आलेय. 2015 पासून चंद्रपुरात दारूबंदी होती. पण त्यानंतर जिल्ह्यात दारूचा काळाबाजार फोफावला होता. मात्र प्रशासानानं दारूबंदी उठवताच चंद्रपुरातल्या मद्यप्रेमींनी मद्याच्या दुकानावर अक्षरशः उड्या मारल्याचं दिसतंय. यात सर्वाधिक मागणी देशी मद्याला असल्याचं दिसतंय. कारण तब्बल ६१ लाख ७५ हजार लिटर देशी दारूचा खप गेले सहा महिन्यात झाल्याचं समोर आलंय.