Chandrakant Patil : 2024 ला एकट लढू; 160 आमदार निवडून आणू, चंद्रकांत पाटलांचे वचन

पुणे : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकट लढू आणि 160 आमदार निवडून आणत पुन्हा सरकार स्थापन करू, असं वचन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांच्यासमोर दिले. तसेच पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीतही आम्ही 120 नगरसेवक निवडून आणू असेही पाटील म्हणाले.  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola