अजितदादा... जरा सांभाळून बोला, आम्ही फाटके आहोत, बोलायला लागलो तर महागात पडेल : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : अजितदादा सांभाळून बोला आम्ही फाटकी माणसं आहोत, आम्ही बोलायला लागलो तर महागात पडेल, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. तसेच खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी मवाळ भूमिका घेऊ नये, सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण मिळवून घ्यावं, असंही चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी म्हटलं आहे.