Chandrakant Patil : परिक्षा रखडल्या, उच्च व तंत्रशिक्षण विभागाला PMO कडून कडक सूचना
Chandrakant Patil : परिक्षा रखडल्या, उच्च व तंत्रशिक्षण विभागाला PMO कडून कडक सूचना
राज्यतील विद्यापीठांच्या रखडलेल्या परीक्षा आणि निकालाच्या ढिसाळ नियोजनाची पंतप्रधान कार्यालयानं दखल घेतली आहे. पीएमओनं महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण खात्याला सूचना देखील केल्या आहेत. या खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच ही माहिती आज विधान परिषदेत दिली. पाटील लवकरच याबद्दल राज्यातील सर्व विद्यापीठांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहेत.