Chandrakant Patil on Eknath Khadse | एकनाथ खडसेंनी राजीनामा देणं हे कटू सत्य : चंद्रकांत पाटील

Continues below advertisement
एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम ठोकला असून ते शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. यासंदर्भात बोलताना खडसे कितीही रागावले तरी हा निर्णय घेणार नाही, याबाबत आम्ही सगळेच आशावादी होतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच ठरलेल्या गोष्टी आपण टाळू शकत नाही, त्यामुळे एकनाथ खडसेंनी राजीनामा देणं हे कटू सत्य असल्याचंही ते म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, 'काही वेळापूर्वीच एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझ्यापर्यंत पोहोचला. त्यांचा राजीनामा हातात पडेपर्यंत मी आणि आम्ही सगळेच आशावादी होतो की, कितीही रागावले तरी खडसे हा निर्णय घेणार नाहीत. ते आमच्याशी बोलतील आणि यातून मार्ग काढून आम्ही पुढे जाऊ. पण शेवटी कोणतीही गोष्ट जी ठरलेली असते, ती आपण टाळू शकत नाही. त्यामुळे हे कटू सत्य आहे की, खडसेंनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे.'
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram