Chandrakant Patil On Pune Flood : सगळ्यांना नुकसान भरपाई मिळणार; पाटलांचं पूरग्रस्ताना आश्वासन
Chandrakant Patil On Pune Flood : सगळ्यांना नुकसान भरपाई मिळणार; पाटलांचं पूरग्रस्ताना आश्वासन
ही बातमी पण वाचा
Pune Rain: पुण्यातील पूर ओसरायला सुरुवात, तरीही अजून लाईट का नाही? अधिकाऱ्यांनी कारण सांगितलं
पुणे : पुण्यातील महापुराचा (Pune Flood) मोठ्या प्रमाणावर पुणेकरांना फटका बसला आहे. आज पुण्यात पावसानं विश्रांती (Pune Rain Update) घेतली असल्याचं चित्र दिसून येत आहे. दरम्यान खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) विसर्ग कमी झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. सिंहगड रोड, एकतानगर परिसर काल जलमय झाला होता. दरम्यान आज खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय त्यामुळे आज पुण्यातील पूरस्थिती (Pune Rain Update) नियंत्रणात आली आहे. सिंहगड परिसरात अनेक भागांमध्ये साचलेलं पाणी ओसरलं आहे. मात्र, अद्याप या भांगामध्ये वीज पुरवठा खंडीत आहे, पिण्याच्या आणि
वापराच्या पाण्याची कमतरता आहे. या भागात पाणी ओसरलं असून देखील अजून लाईट का नाही? याबाबत अधिकाऱ्यांनी कारण सांगितलं आहे.
यावेळी एबीपी माझाशी बोलताना वीज पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एमएससीबीची संपुर्ण टीम एकता नगर भागामध्ये पोहोचली आहे. मात्र अद्याप वीज सोडण्यात आलेली नाही त्याचं कारण म्हणजे, वीजेचे पॅनल आणि मीटर बोर्ड ओले आहेत. त्यामुळे शॉक लागण्याची शक्यता आहे. आपण हळूहळू वीज पुरवठा सुरू करणार आहोत. थोड्या वेळात वीज पुरवठा सुरू केला जाईल. ज्या घरातील मीटर बोर्ड ओले आहेत त्यांना काहीसा वेळ लागणार आहे. काही वेळाने वीज पुरवठा सुरू केला जाईल. काही भागात वीज सुरू केली आहे. टेस्टींग व्हॅन देखील या भागात आहे. ज्या भागात बोर्ड ओले नाहीत त्या भागात वीज पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे एकतानगर, सिंहगड रोड, संगम परिसर, शिवाजीनगर, हॅरीस ब्रिज शांतीनगर झोपडपट्टी, दांडेकर पूल दत्तवाडी आणि विश्रांतवाडी या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. त्यांना आवश्यक सुविधाही दिल्या असून, पूरस्थिती नियंत्रणात आहे. सध्या पावसाने देखील विश्रांती घेतली आहे,