Pooja Chavan Suicide Case | ठाकरे सरकार पूजा चव्हाणला न्याय देणार का? : चंद्रकांत पाटील

Continues below advertisement

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का? असा प्रश्न विचारला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्याय देणार का? अशा प्रश्नांवर नेहमीच न्याय भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तसेच महिलांचा सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर आपण चालतो, असे सांगणारे उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का? असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत. या प्रकरणात एक मंत्री गुंतले आहेत, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, पोलीस का चौकशी करत नाही? मुलीचे आई वडील तक्रार देत नसतील तर सुमोटो केस दाखल केली पाहिजे. या सरकारची प्रतिमा डागळत चालली आहे, काही करा काही होत नाही, असे या सरकारच्या काळात झाले आहे, असा घणाघात पाटील यांनी केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram