
Chandrakant Patil : नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांची मान्यता विद्यापीठ काढणार
Continues below advertisement
नवीन शैक्षणिक धोरणाची जूनपासून अमलबजावणी जे करणार नाहीत त्यांची मान्यता विद्यापीठ काढून घेणार असून 'तुम्ही सुधरा नाहीतर कॉलेजेस बंद करा' या भाषेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शिक्षण संस्थाचालकांना ईशारा दिला आहे. आज सकाळी नाशिकच्या केबीटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आनंदशाळा समारंभाचे उदघाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले होते या कार्यक्रमाच्या भाषणात चंद्रकांत पाटील बोलत होते. आम्ही दम देत नाही, प्रेमाचा ग्रामीण तरुण म्हणून सल्ला देतोय असंही दादा म्हणालेत..
Continues below advertisement