Chandrakant Patil : मराठा आरक्षणासाठी पुन्हा एक कायदा करावा लागेल : चंद्रकांत पाटील
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे आणि सरकारमधील संवाद उत्तम सुरू आहे असं भाजपचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ज्यांच्या कुणबी नोंदी आढळत नाहीत त्यांना आरक्षण देण्यासाठी वेगळा कायदा केला जाईल असं पाटील यांनी म्हटलंय. वेगळं अधिवेशन घेऊन हा कायदा करावा लागेल असं पाटील म्हणाले.