Chandrakant Patil : मनं दुखावणारी वक्तव्य करु नका, मराठा ओबीसी नेत्यांना चंद्रकांत पाटील यांचा सल्ला
Continues below advertisement
Chandrakant Patil : मनं दुखावणारी वक्तव्य करु नका, मराठा ओबीसी नेत्यांना चंद्रकांत पाटील यांचा सल्ला
राष्ट्रीय समाज पक्षाचे १४५ आमदार निवडून आले तर मी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करेन, असं वक्तव्य महादेव जानकर यांनी अमरावतीत केलं होतं. त्यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे आणि महादेव जानकर हे बहीण-भाऊ आहे. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला मोठ्या पदावर पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसंच राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणावरुन सुरु असलेल्या शाब्दिक हल्ल्यांवरही चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलं. ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळे मनं दुभंगणारी वक्तव्ये करु नये, असं पाटील म्हणाले.
Continues below advertisement