Chandrakant Khaire on Vidhan Sabha Election : चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढवणार - ABP Majha

Continues below advertisement

Chandrakant Khaire on Vidhan Sabha Election : चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढवणार - ABP Majha

ही बातमी पण वाचा

Maharashtra Politics : विदर्भात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार; ठाकरे गटाच्या 'या' दिग्गज नेत्याची पुन्हा घरवापसी

Maharashtra Politics :  विधानसभेची निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जवळ जवळ सर्वच महत्त्वाचे पक्ष कामाला लागले आहेत. सक्षम उमेदवाराची निवड, चांगली ताकत असलेले मतदारसंघाची निवड करण्याची प्रक्रिया इत्यादि बाबी राज्यातील पक्षांकडून चालू आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षांकडून आतापासूनच रणनीती आखण्यात येत आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात महायुतील फारसे यश न आल्याचे बघायला मिळाले. तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) विदर्भात घरवापसी करत मोठे यश संपादन केले आहे.

परिणामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) धक्कादायक निकाला अंती विदर्भात महायुतीने काहीसे अधिक लक्ष घातल्याचे दिसून आले आहे. अशातच आता विदर्भात शिवसेना ठाकरे गटाची ताकद आणखी वाढणार असल्याची बातमी समोर आली आहे. कारण नुकतेच उद्धव सेनेतील प्रमुख नेते आणि माजी आमदार रमेश कुथे (Ramesh Kuthe) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत (Uddhav Thackeray Shiv Sena) पुन्हा घरवापसी करण्याची भूमिका घेतली आहे. 

माजी आ. रमेश कुथे पुन्हा शिवबंधन बांधणार

शिवसेनेतून भाजपात प्रवेश करणारे माजी आ. रमेश कुथे यांनी महिनाभरापूर्वी भाजप नेत्यांनी पक्ष प्रवेशापूर्वी दिलेल्या आश्वासनपूर्ती न केल्याचा आरोप करत भाजपला रामराम ठोकला होता. त्यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. दरम्यान असे असताना त्यांनी उद्धव सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेत पुन्हा घरवापसी करण्याची भूमिका घेतली आहे. यासाठी ते आपल्या समर्थकांसह काल गुरुवारी मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते आज शिवबंधन बांधणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram