Chandrakant Khaire On Shinde Sena : 20 ते 22 आमदार शिंदेंना सोडणार, चंद्रकांत खैरेंचं मोठं वक्तव्य

Continues below advertisement

Chandrakant Khaire On Shinde Sena : 20 ते 22 आमदार शिंदेंना सोडणार, चंद्रकांत खैरेंचं मोठं वक्तव्य 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Election) भाजपने शिंदे गटातील, तसेच शिंदेंच्या (Shivsena) आमदारांविरुद्ध विधानसभा लढवलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतल्याने महायुतीत भडका उडाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे आजच मंत्री दादा भुसेंविरुद्ध निवडणूक ढललेल्या अद्वैत हिरे आणि संजय शिरसाटांविरुद्ध निवडणूक लढलेल्या राजू खरेंचा भाजपात प्रवेश झाला. त्यामुळे, महायुतीमधील भाजप-शिवसेनेतील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जातह होती. मात्र, शिवसेना नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांनी या वादावर भूमिका मांडली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आज शिवसेना मंत्र्‍यांनी दांडी मारल्याने महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला असून आता दोन्ही पक्षांकडून सारवासारव केली जात आहे.  शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला बहिष्कार घातला. शिवसेनेकडून केवळ एकनाथ शिंदे हेच मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा धर्म न पाळता भाजपकडून करण्यात येणाऱ्या फोडाफोडीमुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गैरहजर राहिले. तसेच, निधीवाटप आणि इतरही मुद्द्यांमुळे मंत्री नाराज होते. त्यामुळे मंत्र्‍यांनी आज एकनाथ शिंदेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. या बैठकीत नेमकं काय झालं याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. कुटुंबात वाद विवाद होत राहतात मनातली भावना व्यक्त करायची असते. आम्ही आमच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत. निवडणुका सुरू आहेत, पक्ष प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे थोडीशी नाराजी होती. जी नाराजी आहे याबाबत चर्चा झाली आहे, कुणीही महायुतीमधील नेते, पदाधिकारी, नगरसेवक एकमेकांच्या पक्षात घेणार नाहीत अशी चर्चा झाली. महायुतीमधील एकमेकांचे नेते, आमदार, नगरसेवक एकमेकांच्या पक्षात घ्यायचे नाहीत असं तिन्ही पक्षानी ठरवलं आहे. उद्यापासुन याची अमलबजावणी होईल, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola