Bullock Cart Race: चंद्रहार पाटलांकडून सांगलीत बक्षिसांचा वर्षाव, 2 Fortuner, 2 Thar, 7 ट्रॅक्टर बक्षीस
Continues below advertisement
डबल महाराष्ट्र केसरी आणि शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील तासगावजवळ भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासोबतच बैलगाडा शर्यत संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी बक्षिसांची मोठी घोषणा करण्यात आली आहे; यामध्ये दोन फॉर्च्युनर, दोन थार, सात ट्रॅक्टर आणि तब्बल दीडशे दुचाकींचा समावेश आहे. दिवसभर चालणाऱ्या या स्पर्धेमुळे आणि लाखोंच्या बक्षिसांमुळे ही शर्यत लक्षवेधी ठरली आहे. श्रीनाथ केसरी नावाने होणाऱ्या या स्पर्धेकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शौकिनांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement