चंद्रभागेत जागोजागी बंधारे, पाण्याचा प्रवाह थांबला, स्नानानंतर त्वचा विकार, भाविकांची तक्रार
पंढरपुरातील चंद्रभागेचं पाणी प्रदूषीत झालंय. नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर आळ्या आणि किडे पडले आहेत. स्नानाला येणाऱ्या भाविकांना प्रदूषित झालेल्या चंद्रभागेमुळे त्वचा विकार होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. त्यामुळे या पाण्याला प्रवाहीत करून प्रदूषण दुर करण्याची मागणी होत आहे.