Chandrapur :वाघ आणि गावकरी एकमेकांसमोर आल्याची आणि वाघाची आक्रमकता पाहून गावकऱ्यांनी घेतली माघार
वाघ आणि गावकरी एकमेकांसमोर आल्याची आणि वाघाची आक्रमकता पाहून गावकऱ्यांनी माघार घेतल्याची चित्तथरारक घटना चंद्रपूर शहराजवळील भटाळी गावात उघडकीस आली आहे. काल दुपारी भटाळी गावाजवळ असलेल्या इरई नदी शेजारी वाघाने एका गाईची शिकार केली. या वेळी गुराख्याने आरडाओरड करून वाघाला पिटाळून लावले आणि गावात जाऊन लोकांना याची माहिती दिली. थोड्या वेळाने गावकरी घटनास्थळी आले मात्र इतक्या वेळात वाघ आपल्या शिकारीसाठी परत आला होता. गावकऱ्यांनी पुन्हा एकदा वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र गावकऱ्यांना पाहून वाघ अधिकच चवताळला. आणि त्यानं आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहताच गावकऱ्यांची भंबेरी उडाली. गावकऱ्यांनी त्यानंतर तिथून काढता पाय घेतला.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News चंद्रपूर ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron चंद्रपूर Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv भटाळी