Chanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचं मोठं वक्तव्य
((संघाबद्दल नड्डा यांचं मोठं वक्तव्य))
मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?))
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज मालेगावात सभा, नतंर मुंबईत उज्ज्वल निकमांसाठी देखील प्रचार करणार
((मालेगावमध्ये गरजणार योगी आदित्यनाथ))
निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार, सोमवारी मुंबई, ठाणे, कल्याणसह १३ जागांवर मतदान
((आज थंडावणार प्रचाराच्या तोफा))
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, नंतर दोघं नेते प्रचारासाठी एकत्र रवाना
((राज ठाकरे, शेलारांमध्ये खलबतं))
संभाजीनगर गर्भलिंग निदान प्रकरणी आयुर्वेदिक डॉक्टर रोशन ढाकरेला अटक, रॅकेटमध्येे १५ ते २० एजंट्सचा सहभाग असल्याचं तपासात समोर
((डॉक्टरच घ्यायचा अर्भकांचा जीव))
नागपूरह विदर्भाला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं वर्तवली वादळी पावसाची शक्यता
((विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट))
मुंबईतला उकाडा सोमवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम
((मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचेच))
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आज आणि उद्या दीड तास बंद राहणार, ओव्हरहेड गँट्रीच्या कामासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी साडे दहा ते दुपारी १२ पर्यंत बंद ठेवणार
((एक्स्प्रेसवे दीड तास बंद राहणार))
हरियाणाच्या नूहमध्ये भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा मृत्यू तर २४ जण जखमी
((हरियाणात बसला आग, ८ भाविक मृत्युमुखी))
तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील बेपत्ता अभिनेता गुरुचरण सिंग २५ दिवसांनी घरी परतला, आध्यात्मिक यात्रेवर गेल्याचा दावा
((तारक मेहता फेम 'सोढी'ची घरवापसी))