Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 17 मे 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 17 मे 2024 : ABP Majha

लोकसभेला उमेदवारी न मिळाल्यानं मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. हेमंत गोडसेंच्या प्रचारात भुजबळांचा जास्त सहभाग नसल्यामुळे चर्चांना उधाण.

छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चेनंतर भाजप नेते गिरीश महाजनांनी घेतली भुजबळांची भेट. भुजबळ फार्मवर ((झाली)) दोघांची भेट. भुजबळांची नाराजी महाजनांनी दूर केल्याची माहिती.

छगन भुजबळ कुठेही नाराज नाहीत, ते सध्या कामाला देखील लागले आहेत. मोदींच्या सभेत त्यांनी जोरदार भाषण केलं होतं. भुजबळांच्या नाराजीच्या बातमीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. 

भुजबळ नाराज आहेत हे आम्ही ऐकलं होतं, आमच्या संपर्कात कोणी नाही. बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड फक्त उद्धव ठाकरेच, राज ठाकरे नाही. जयंत पाटलांची भुजबळांच्या नाराजीच्या वृत्तावर प्रतिक्रिया.

छगन भुजबळ नाशिकच्या प्रचारात सक्रिया नाही यात काही तथ्य नाही. भुजबळ आणि त्यांची यंत्रणा सध्या सक्रिय. त्यांच्या नाराजी ही फक्त जागा वाटपापर्यंत होती, त्यानंतर काही प्रश्न नाही. भुजबळांच्या नाराजीवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया.

छगन भुजबळ नाराज नसून ते प्रचारात सक्रिय, शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांची माहिती. 

नाशिकमध्ये शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलला सुनील तटकरेंनी भेट दिली, अनिल देशमुखांचं सूचक वक्तव्य, तर सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, देशमुखांचं विधान. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram