Chanda Te Banda : चांदा ते बांदा महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 27 May 2024

Chanda Te Banda : चांदा ते बांदा महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 27 May 2024

पुण्यातील कल्याणी नगर कार अपघात प्रकरणात दोन डॉक्टर अटकेत, ससूनचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांनी ब्लड रिपोर्ट मधे फेरफार केल्याचा आरोप.

ससूनच्या डॉक्टरांनी पुण्यातील कल्याणी नगर कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन   मुलाचे ब्लड सॅंपल बदलले, मुलाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना पैशांचं आमिष. 

पुण्यातील कार अपघातातील अल्पवयीन मुलाच्य़ा ब्लड सॅंपलच्या जागी दुसऱ्याच एका रुग्णाचे ब्लड सॅंपल टेस्टिंगसाठी देण्यात आले, मात्र पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणखी एका लॅबला पाठवून डीएनए टेस्ट केल्यानं ससूनच्या डॉक्टरांचं बिंग फुटलं. 

डॉ श्रीहरी यांनी हे ब्लड रिपोर्ट अजय तावरे यांच्या सांगण्यावरून बदलले, ससून रुग्णालयात दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचे सँपल घेतले आहेत याचा पोलिसांकडून शोध सुरु, पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती.

विशाल अगरवालवर आणखी एक गुन्हा दाखल
होण्याची शक्यता, डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट
फेरफार केल्याप्रकरणी विशाल अगरवालविरोधात वॉरंट, विशाल अगरवालकडून अजय तावरेला फोन.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola