चाळीसगाव-कन्नड घाटात पोलिसांकडून वसुली? ट्रकचालकाच्या वेशभूषेत MLA Mangesh chavan यांच्याकडून स्टिंग

पोलीस चिरीमिरी घेत नाही असा नाका शोधूनही सापडणार नाही.. कुठे चोरीछुपे... तर कुठे उघडपणे... पोलिसांचा खिसा गरम करणं हा जणू अलिखित नियमच आहे अशा अविर्भावात सगळं काही सुरु असतं.. मात्र जळगावचे आमदार मंगेश चव्हाण याला अपवाद ठरलेत.. त्यांनी चक्क ट्रक चालकाचं सोंग घेऊन चाळीसगाव-कन्नड घाटात वाहनचालकांकडून वसुली करणाऱ्या पोलिसांचा पर्दाफाश केला आहे. स्वतः आमदारांनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशनची खानदेशात जोरदार चर्चा आहे.. आमदारांच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी करण्यात येतेय.. लोकप्रतिनिधींनी अशी बेधडक भूमिका घेतली तर प्रशासन आणि यंत्रणांवर नक्कीच वचक राहील

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola