Chalisgaon Flood : पूर आला होता, पण वेळ आली नव्हती; 6 वर्षाच्या नवाजच्या मदतीसाठी 'देवदूता'ची धाव

Continues below advertisement
चाळीसगावातील तितूर नदीला आलेल्या महापुराची भिषणता दाखवणारे अनेक व्हिडीओ समोर येत असून अंगावर काटा आणणाऱ्या एका रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागलाय. चाळीसगाव शहरात गॅरेजचा व्यवसाय करणाऱ्या कलीम सैय्यद यांचा 6 वर्षाचा चिमुकला नवाज हा नदीकिनारी उभ्या केलेल्या एका ट्रकमध्ये सोमवारी रात्रि झोपी गेला मात्र मंगळवारी पहाटे नदीला महापूर आला आणि पाण्याच्या पातळीत अचानक एवढी वाढ झाली की ट्रकच्या वरील भागापर्यंत पाणी येऊन पोहोचले. ट्रकच्या टपावर उभा राहून मुझे बचाव, मुझे बचाव अशी नवाज हाक देत होता आणि हे बघताच दोन तरुणांनी दोराच्या सहाय्याने त्याला बाहेर काढ़ण्याचे प्रयत्न सुरु केले आणि यातिल एकाने अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालून नवाजला सुखरूपपणे पाण्यातून बाहेर काढ़ले आणि हे बघताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत या तरुणांचे आभार मानले. दरम्यान नवाज आणि त्याच्या वडिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram