Chakan Traffic Protest | चाकणकरांचा PMRDA वर मोर्चा, खासदार Amol Kolhe-पोलिसांत शाब्दिक चकमक
Continues below advertisement
वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या चाकणमधील नागरिक आणि एमआयडीसी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. हुंदाई, ऑटोलाइन, मास्क, दीक्षा या कंपन्यांचे कर्मचारीही यात सहभागी झाले होते. चाकण ते आकुर्डी पीएमआरडीए असा पंचवीस किलोमीटरचा हा मोर्चा 'वाहतूककोंडी मुक्त चाकण कृती समिती'ने आयोजित केला होता. खासदार अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव आणि बाबाजी काळे यांनी मोर्चात सहभाग घेतला. पीएमआरडीए कार्यालयाच्या आधी मोर्चा थांबवण्यात आला. यावेळी पोलीस आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पुणे-नाशिक हायवेवरील एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाचे टेंडर पंचवीस ऑक्टोबरला उघडणार आहे. मात्र, तळेगाव-चाकण-शिखरापूर डेव्हलपमेंट आणि आजूबाजूच्या कोलाटरल रोड्ससाठी निधीची तरतूद आणि प्लॅनिंगची गरज आहे. मोर्चातील सहभागींनी मागणी केली की, "मान्य मुख्यमंत्री महोदय, जे पीएमआरडीएचे चेअरमन आहेत, त्यांनी या संदर्भातला कॉम्प्रेहेन्सिव मोबिलिटी प्लॅन पुढच्या काही दिवसांत जाहीर करून त्याला एक टाईम बाउंड प्रोग्राम दिला पाहिजे, तरच चाकणच्या ट्राफिकचा प्रश्न सुटेल."
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement