Chagan Bhujbal Exclusive : कोणत्याही पक्षात जाणार नाही, मी नाराज नाही : छगन भुजबळ
Continues below advertisement
नाराजीच्या चर्चेनंतर छगन भुजबळ यांनी एबीपी माझासोबत बोलताना या सर्व अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिलं. विधानसभेआधी अथवा नंतर मी कुठेही जाणार नाही. मी दादांबरोबर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. कायमच राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिल, असे छगन भुजबळ म्हणाले. मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यात संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर चर्चेला आणखी जोर आला होता. याबाबत एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रसारमाध्यमांकडे सध्या दाखवण्यासाठी काही नसल्यामुळे भुजबळांच्या बातम्या दाखवल्या जात आहेत, असेही भुजबळ म्हणाले.
Continues below advertisement