Maharashtra Vidhan sabha Assembly | Aaditya Thackeray vs Nilesh Rane, विधानसभेत खडाजंगी!
विधानसभेच्या अधिवेशनात आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मुंबईकरांवर लावण्यात आलेल्या कचरा टॅक्सच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी 'चड्डी बनियन गँग' असा उल्लेख करत हल्लाबोल केला. यावर निलेश राणे यांनी आक्षेप घेतला. ही 'गँग' नेमकी कोण आहे, हे स्पष्ट करावे किंवा हा शब्द कामकाजातून काढून टाकावा, अशी मागणी निलेश राणे यांनी केली. "पहिली गल है कि सारी गलती मेरी नहीं. चल जी है भी तो क्या अमे तेरी नहीं?" असे बोलत मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईकरांच्या आणि शहराच्या मागण्यांवर लक्ष देऊन 'चड्डी बनियन गँग'वर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. शासन जनतेसाठी कसे चालते हे दाखवून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. निलेश राणे यांनी 'चड्डी' कोण आणि 'बनियान' कोण हे स्पष्ट करण्याचे आव्हान दिले. सभागृहात असे शब्द वापरू नयेत, असेही ते म्हणाले.