Central Railway | राज्यांतर्गत एक्सप्रेसमध्ये वाढ,11 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेवर आणखी 8 गाड्या धावणार
रेल्वेने मुंबई आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या पाच एक्सप्रेस सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला असताना आता त्यात वाढ करून आणखीन आठ एक्सप्रेस सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, लातूर आणि नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या स्पेशल एक्सप्रेस मध्य रेल्वे सुरु करणार आहे. येत्या 11 तारखेपासून या एक्सप्रेस धावू लागतील असे मध्य रेल्वेने सांगितले आहे.