Mumbai Local : मध्य रेल्वे ठप्प! मालगाडीचं इंजिन फेल, प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरले

Continues below advertisement
मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईकडे (Mumbai) येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या कर्जत (Karjat) ते CSMT मार्गावर वांगणी (Vangani) आणि शेलू (Shelu) स्थानकांदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या बिघाडामुळे मुंबईकडे येणाऱ्या अनेक लोकल गाड्या (Local Trains) थांबवण्यात आल्या, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अनेक प्रवासी लोकल ट्रेनमधून उतरून रेल्वे ट्रॅकवरून (Railway Track) चालत जवळच्या बदलापूर (Badlapur) स्टेशनच्या दिशेने जाताना दिसले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola