Central Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वेवर उद्याचा मेगाब्लॉक रद्द

Continues below advertisement

रविवारी म्हणजे उद्याच जर तुम्ही रेल्वेनं प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी...
मध्य रेल्वेवर उद्याचा मेगाब्लॉक हा रद्द करण्यात आलाय. त्यामुळे रविवारी मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.  पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. तर पश्चिम रेल्वेने रेल्वे रूळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. तसंच या पाच तासांच्या ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत,

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram