Railway Safety : 'प्रवाशांची चूकच जबाबदार', Central Railway चा अहवाल, अभियंत्यांवर गुन्हा
Continues below advertisement
मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघाताच्या प्रकरणात Central Railway, लोहमार्ग पोलीस आणि VJTI या तिन्ही संस्थांच्या अहवालांमध्ये विरोधाभास दिसून आला आहे. Central Railway च्या समितीने 'प्रवाशांची चूकच जबाबदार' असल्याचं म्हटलं, तर VJTI आणि लोहमार्ग पोलिसांच्या तपासात 'ट्रॅक मेंटेनन्स करणाऱ्या अभियंत्यांची चूक' असल्याचं नमूद करण्यात आलं. या तपासानंतर पोलिसांनी दोन अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. 'प्रवाशांच्या बॅगा घसल्यानं अपघात झाला,' असं Central Railway च्या अहवालात म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर अभियंत्यांनी अटकेपासून संरक्षण मिळावं, अशी मागणी करत कोर्टात अर्ज दाखल केला असून, आज त्यावर सुनावणी होणार आहे. काल रेल्वे कर्मचारी संघटनांनी या विरोधात आंदोलन केलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement