ABP News

Central Railway Mega Block : मध्य रेल्वेवर 1 आणि 2 जूनला 36 तासांचा महामेगाब्लॉक

Continues below advertisement

मुंबई : लोकल प्रवाशांसाठी (Local Train) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर 62 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यापासून मध्य रेल्वेवरील प्रवास टाळला तरच बरा, अशी परिस्थिती आहे. हा ब्लॉक 30 मे रोजी रात्री पासून हा ब्लॉक सुरू होईल. डाऊन फास्ट लाईन साठी 62 तासांचा तर, अप स्लो लाईनवर 12 तासांचा हा ब्लॉक असणार आहे. दरम्यान, 1 आणि 2 जूनला सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर 62 तासांचा ब्लॉक

मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांनी सांगितलं की, 1 आणि 2 जूनला सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा ब्लॉक होणार आहे. सीएसएमटी स्थानकात 10 आणि 11 नंबरच्या फलाटची लांबी वाढवण्यासाठी हा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. फलाटाचा विस्तार केल्यानंतर 16 किंवा त्यापेक्षा जास्त डब्यांच्या गाड्या या प्लॅटफॉर्मवर थांबवता येतील. तर दुसरीकडे ठाणे स्थानकात देखील एक ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram