Onion Price Hike | 21 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय | ABP Majha
Continues below advertisement
केंद्र सरकारनं २१ हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा दरवाढीवरुन देशभरात संतापाचं वातावरण झालंय. २० रुपये किलोचा कांदा आता दीडशे रुपये प्रतिकिलोनं मिळतोय. त्यामुळे केंद्र सरकारनं कांदा आयात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी तीन जागतिक टेंडरही काढण्यात आले आहेत. त्यासाठी तुर्की आणि युरोपियन युनियनकडे प्रत्येकी ५ हजार मेट्रिक टन कांद्याचं टेंडर तर, एक जागतिक टेंडर काढण्यात आलंय. शिवाय, नव्या टेंडरमुळे अनेक अटीही आता केंद्र सरकारनं शिथिल केल्या आहेत. त्यात होलसेलरना २५ मेट्रिक टन आणि रिटेलरसाठी ५ मेट्रिक टन कांदा साठवणुकीची परवानगी देण्यात आली आहे.
Continues below advertisement