Marathi language day | मराठी भाषा दिनानिमित्त विधानभवन परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन | ABP Majha

सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी खास ग्रंथदिंडी आणि ग्रंथप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ग्रंथदिंडीच्या पालखीचे भोई झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसंच विधानभवन परिसरात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाची पाहणीही मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola