CD Theft : 'आता सीडी लावतो' म्हणणाऱ्या Eknath Khadse यांच्या घरातून महत्वाच्या CD चोरी
Continues below advertisement
Eknath Khadse यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात झालेल्या चोरीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. 'आता सीडी लावतो' असं म्हणणाऱ्या खडसेंच्या घरातील महत्वाच्या CD, पेन ड्राइव, कागदपत्रे आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. चोरीच्या रात्री चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून सात टोळे सोनं, पस्तीस हजारांची रोकड, तसेच भ्रष्टाचाराच्या पुराव्यांची कागदपत्रे आणि CD चोरली आहेत. काही महत्वाच्या CD कोकणात सुरक्षित ठिकाणी असल्याचं सांगितलं जातं. या घटनेमुळे चोरीमागे नेमकं कोणाचा हात आहे, आणि खडसेंच्या धमकी दिलेल्या CD मध्ये काय आहे, यावर चर्चा रंगली आहे. पोलिस तपास सुरू असून, राजकीय वर्तुळात या चोरीमुळे मोठी चर्चा सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement