CBSE Board Exams | सीबीएसईकडून दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा; 2026 पासून नवा नियम लागू
सीबीएसईने 2026 पासून दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी आणि मे महिन्यात या परीक्षा होतील. फेब्रुवारीची परीक्षा अनिवार्य असेल, तर मे महिन्यातील परीक्षा ऐच्छिक राहील. दोन्ही परीक्षांसाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा केंद्र एकच असतील. अंतर्गत मूल्यमापन मात्र वर्षातून एकदाच होईल.