CBSE Open Book Exam | नववीसाठी आता Open Book परीक्षा, ताण कमी होणार, सीबीएसईचा मोठा निर्णय
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नववीच्या परीक्षा Open Book पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. या निर्णयानुसार, परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तकं, नोट्स आणि संदर्भ ग्रंथ सोबत ठेवण्याची आणि त्यांचा वापर करण्याची परवानगी असेल. या बदलामागे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. यापुढे केवळ पाठांतरावर भर न देता, संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. "परीक्षेचं ताण कमी करून संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर आता भर दिला जाणार आहे," असे मंडळाने स्पष्ट केले आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणेल अशी अपेक्षा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विषयांची सखोल माहिती मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे आकलन अधिक सुधारेल.