वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती
साताऱ्यात असलेल्या वाधवान कुटुंबियांचा क्वॉरन्टाईन काळ 23 तारखेला संपल्यानंतर अखेर आज धीरज आणि कपिल वाधवान या बंधूंना सीबीआयने आपल्या ताब्यात घेतलं आहे. सीबीआयने सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतलं असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत दिली आहे. वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईन काळ संपल्यानंतर आम्ही ईडी आणि सीबीआयला पत्र लिहून त्यांचा ताबा घेण्याची विनंती केली आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी 22 एप्रिलला दिली होती. अखेर आज वाधवान बंधूंना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे.