Caste Validity Certificate | उच्च शिक्षण प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची कसरत, आर्थिक नुकसानीची भीती!

उच्च शिक्षण प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) मिळवण्यासाठी पालक आणि विद्यार्थी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयांमध्ये रांगा लावत आहेत. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख आता जवळ आली आहे. MCSEET साठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख उद्या आहे, तर सिटीसेलमधून प्रवेश होण्यासाठी एक ते दोन आठवडेच उरले आहेत. त्यामुळे या कमी कालावधीत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांनंतर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी हे जात वैधता प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे. प्रमाणपत्र काढण्यासाठी पालकांना विभागीय सहायक विभाग कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. एका पालकाने सांगितले की, “मला जातीचे दाखल्याची पडताळणी करायची आहे अने दोन तीन चक्र मारलंय हे फेब्रुवारीपासून। तरी आता इथे क्युरे आलीय काल। मेसेज आलाय की तुमच्या १९५०पूर्वीचा जात नियाय नाशिकचा पुरावा पाहिजे। तर तो पुरावा तर काही भेटत नाही अने कॉलेजमध्ये आता अडमिशन प्रक्रिया चालू आहे।ती प्रक्रिया चालू असल्यामुळे पेपर इथून काही भेटत नसतील आणि हे पेपर जर नसतील तर प्रत्येक वर्षी दीड लाख रुपये खर्च येईल असं एक अंदाजून।” प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. तांत्रिक अडचणींमुळे अर्जदारांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा आढावा नाशिकमधून आमच्या प्रतिनिधींनी घेतला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola