Sharad Pawar On Sangram Jagtap : 'जातीजातीत तणाव निर्माण होईल अशी विधानं चुकीची' - शरद पवार

Continues below advertisement
संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानांवर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रदेश कार्यालयात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत शरद पवार यांनी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांसमोर 'जातीजातीत तणाव निर्माण होईल अशी विधानं चुकीची आहेत' असं स्पष्टपणे सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, कोणत्याही कार्यकर्त्यांनी जातीय सलोखा बिघडवणारी कृती करू नये, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. शरद पवार यांनी संग्राम जगताप यांच्या विधानांचा निषेध करत, पक्षातील सर्वांना सलोखा राखण्याचं आवाहन केलं. माध्यमांशी त्यांनी प्रतिक्रिया दिली नसली तरी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola