MLA Ranjit Kamble : देवळीचे काँग्रेस आमदार रणजीत कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
आमदार रणजीत कांबळे यांच्यावर वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांना फोनवर शिवीगाळ त्यांना महागात पडली आहे. डॉ. डवले यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा अधिनियम तसंच कलम 506 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.