Palghar Accident : अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि लक्झरी बस एकमेकांवर धडकून भीषण अपघात

Continues below advertisement

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूतल्या महालक्ष्मीजवळ कार आणि लक्झरी बस एकमेकांवर धडकून झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ती कार समोरून येणाऱ्या लक्झरी बसवर धडकली. हा अपघात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात कारमधील चौघांचाही जागीच मृत्यू झाला, तर लक्झरी बसमधील तीन प्रवासी जखमी आहे. कारमधील चारही प्रवासी गुजरातच्या बारडोलीचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram